तुला पाहताना, तुला शोधिताना,
विसर ह्या जगाचा, पडे का मनाला...?
अशा धुंद राती, तुझी भेट होता,
थांबे हि वेळ, मला का कळेना...?
जो कधी उलगडे, आठवांचा पसारा,
तुझा गंध हा, छेडितो का मनाला...?
झालो जरी व्यक्त, काव्यातुनी ह्या,
तरीही तुझे गीत, रहाते उरी का...?
तरीही तुझे गीत, रहाते उरी का...?
No comments:
Post a Comment