Thursday, July 16, 2015

कुठल्याशा ओल्या सकाळी...

कुठल्याशा ओल्या सकाळी
रिमझिम पावसाची सर
अशावेळी, सांग गं सखे
कसा पडेल तुझा विसर...

वाफळत्या कॉफीचा गंध
ओल्या मातीचा सुवास
अशावेळी, सांग गं सखे
का नसावा तुझा सहवास...

दाटलेल्या मेघांसारखे
मन हि दाटून येते
अशावेळी, सांग गं सखे
का तुझीच आठवण येते...

कुठल्याशा ओल्या सकाळी
थंडगार वारा वाहतो
अशावेळी, सांग गं सखे
का तुझाच भास होतो...
अशावेळी, सांग गं सखे
का तुझाच भास होतो...

कुठल्याशा ओल्या सकाळी...

2 comments:

  1. Replies
    1. Rain always makes it easier to express... :-)
      Thanks for ur comment...!!! :-)

      Delete