Thursday, May 21, 2015

न दिसला मज गुलाब...

न दिसला मज गुलाब
न दिसला मज चाफा
गंध कुणाचा दरवळे
चोहीकडे... चोहीकडे...

न दिसले मज कुणी
भास कसले ह्या मनी
साद कोण घालत असे
पलीकडे... पलीकडे...

व्यर्थ वाटे मज सारे
चंद्र, सूर्य, नभातले तारे
रविचे तेज ही कमी भासे
तुझ्यापुढे... तुझ्यापुढे...

सांग सखे मज काय करावे
एकटे असे किती झुरावे
ये धाउनिया, मिठीत ये
माझ्याकडे... माझ्याकडे...

No comments:

Post a Comment