वाढदिवस...
एक गमतीदार दिवस,
कुठलाही शेम्डा पोरगा
भाव खाईल, असा दिवस.
काधीनव्हे ते आपण
मानाच्या स्थानी असतो,
रुबाबत, ऐटीत मिरवत
सिंहासनावर विराजमान होतो.
इथे घातलेले मुकुट
अजीबात काटेरी नसते,
मायेच्या फुलांनी
छान सजवलेले असते.
छान सजवलेले असते.
आपण फक्त हुकुम सोडायचे
सगळे जागेवर मिळते,
घरच्यांना कामाला लावायची
मजाच काही और असते.
ह्याचे-त्याचे फोन घेऊन
जाम थकायला होते,
'थॅंक यू' म्हणण्याचे मशीन
असण्याची, गरज मात्र भासते.
आजीचे लाड
आईची माया,
ह्या गोष्टींसाठी वाटतं
वाढदिवस रोजच यावा.
अमुक वर्षांचा घोडा झालास
हे नेहमी आपण ऐकतो,
आपल्या मानवी घोड्याचे रूप पाहून
मनातल्या मनात हसतो.
आईची माया,
ह्या गोष्टींसाठी वाटतं
वाढदिवस रोजच यावा.
अमुक वर्षांचा घोडा झालास
हे नेहमी आपण ऐकतो,
आपल्या मानवी घोड्याचे रूप पाहून
मनातल्या मनात हसतो.
आता वय वाढलं
म्हणून रडायचं,
कि ह्या वर्षभरात
सुचलेल्या शहाणपणाने आनंदायचं.
काही कळतच नाही बुवा…
मनाला आनंद होतो
हे मात्र नक्की,
भले दुसऱ्यादिवशी
एकटे वाटले तरीही.
म्हणून रडायचं,
कि ह्या वर्षभरात
सुचलेल्या शहाणपणाने आनंदायचं.
काही कळतच नाही बुवा…
मनाला आनंद होतो
हे मात्र नक्की,
भले दुसऱ्यादिवशी
एकटे वाटले तरीही.
वाढदिवस येत जातो
वय वाढत जातं,
एक-एक पाउल आयुष्याच्या
'फिनिश लाईन'कडे पडत जातं….!!!!
तरीही आपण म्हणतोच…. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!!
वय वाढत जातं,
एक-एक पाउल आयुष्याच्या
'फिनिश लाईन'कडे पडत जातं….!!!!
तरीही आपण म्हणतोच…. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!!

No comments:
Post a Comment