Tuesday, August 12, 2014

यारी...

यारी...

जब से है होश संभाला
तब से है एक बात जानी
यारों बिना
न जिंदगी सुहानी

जाने कब और कहा
कुछ पागल मिल गए
उन पागलो कि कतार में
साला हम भी शामिल हुए

अंजाने हाथ थामे
चल पडे हम
और साथ देते गए
कुछ अंजाने कदम

कदम से कदम मिलाना
इन्ही से सीखा
परिंदो की तरह उडना भी
इन्ही से सीखा

खुली आँखों से सपने देखना
इन्ही से सीखा
आँखे मूँदकर भरोसा करना भी
इन्ही से सीखा

जब दूर गए
तब इन्ही की याद आई
यादों के समंदर में तैरना
है इन्ही कि सिखाई

कुछ यादे, कुछ बाते
हमेशा याद रहते है
कुछ दोस्त, कुछ यार
हमेशा साथ रहते है

यही है...
मेरे यारों कि यारी
जिसने बनाई
मेरी जिंदगी सुहीनी...!!!

Monday, July 28, 2014

मैं चल पडा...

अपना सामान बाँधे
कुछ आशाएँ लिए
अंजानी राह पर
मैं चल पडा...

अपनो से दूर
अंजानो के पास
मुठ्ठी भर हिम्मत लिए...
अनगिनत सवालों से
हर इक पल जूंजकर
कुछ अपने हि जवाब लिए...

बाप से थोडी जिद
माँ से ममता
और झोली भर खुशियाँ लिए
मैं चल पडा...

आखिर पहुँचा वहाँ
जो थी मंजिल कभी
पता चला
बहुत चलना है अभी...

कुछ दोस्त बनाते
कुछ दुश्मन साथ लिए
एक नई मंजिल कि ओर
मैं फिर चल पडा...

मंजिले बदलती गई
लोग मिलते गए
अपनो से दूर होने का गम छुपाते
मैं चल पडा...

हालाकी, जीत अभी दूर है
थम जाना, नामंजूर है
अपने बुलंद हौसलो को साथ लिए
मैं.. फिर.. एक बार..चल पडा...!!

Sunday, June 22, 2014

मन एकटेच सारे ...

मन एकटेच सारे
स्वप्ने बघुन गेले,
हे पाखरु मनाचे
हलकेच उडून गेले.

पाहिलेली स्वप्ने
ह्रदयी अजून आहे,
पाहिली ती तू ही
हि आस अजुन आहे.

डोळ्यात साठलेले
ते रूप तुझेच आहे,
स्वपनातल्या परिचे
प्रतिबिंब तुझेच आहे.

गुलाबी भावनांचा
कल्लोळ हा कसा रे,
जाणीवा नवीन
नवीन ही नशा रे.

ऐकले का तू
स्वर माझ्या मनी जे
जाणले का तू,
भाव माझ्या मनी जे.

अंतरांचे हे अंतर
मिटतील का रे,
स्वप्नातली साथ....खरंच
लाभेल का रे....?
स्वप्नातली साथ....खरंच
लाभेल का रे....

मन...एकटेच सारे...

Sunday, April 13, 2014

मुके शब्द सारे ...

मुके शब्द सारे
बोलून गेले,
भाव मनी ह्या
सांगून गेले.

अधीर मन हे
जाणवून गेले,
आस भेटण्याची
लावून गेले.

मन स्पर्श वेडे
होऊन गेले,
मिठीत ये अशी
खुणवून गेले.

न सोडणे आता
ठरवून गेले,
अंतराचे अंतर
मिटवून गेले.

भाव ओठी ह्या
येउन गेले,
तू ऐकले ते
भासवून गेले.

ठाऊक आहे तुला
मज पटवून गेले,
भास हे सत्यात
उतरून गेले.

क्षण हे सारे
मोहरून गेले,
प्रेमात चिंब
भिजवून गेले.

तुझ्या प्रेमात चिंब
भिजवून गेले ...!!!

                       ---- Kavi Rahul

Saturday, March 8, 2014

वाढदिवस...

वाढदिवस...
एक गमतीदार दिवस,
कुठलाही शेम्डा पोरगा
भाव खाईल, असा दिवस.

काधीनव्हे ते आपण
मानाच्या स्थानी असतो,
रुबाबत, ऐटीत मिरवत
सिंहासनावर विराजमान होतो.

इथे घातलेले मुकुट
अजीबात काटेरी नसते,
मायेच्या फुलांनी
छान सजवलेले असते.














आपण फक्त हुकुम सोडायचे
सगळे जागेवर मिळते,
घरच्यांना कामाला लावायची
मजाच काही और असते.


ह्याचे-त्याचे फोन घेऊन
जाम थकायला होते,
'थॅंक यू' म्हणण्याचे मशीन
असण्याची, गरज मात्र भासते.

आजीचे लाड
आईची माया,
ह्या गोष्टींसाठी वाटतं
वाढदिवस रोजच यावा.

अमुक वर्षांचा घोडा झालास
हे नेहमी आपण ऐकतो,
आपल्या मानवी घोड्याचे रूप पाहून
मनातल्या मनात हसतो.

आता वय वाढलं
म्हणून रडायचं,
कि ह्या वर्षभरात
सुचलेल्या शहाणपणाने आनंदायचं.

काही कळतच नाही बुवा…

मनाला आनंद होतो
हे मात्र नक्की,
भले दुसऱ्यादिवशी
एकटे वाटले तरीही.

वाढदिवस येत जातो
वय वाढत जातं,
एक-एक पाउल आयुष्याच्या
'फिनिश लाईन'कडे पडत जातं….!!!!

तरीही आपण म्हणतोच…. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!!