Tuesday, November 17, 2015

याद तुझी...

याद तुझी, बात तुझी
एक बस साथ तुझी
माझ्या ह्या ह्रदयाला
एक बस अास तुझी

उगवणारा सूर्य भरे
क्षितिजावर रंग जसा
सहवासाने चढितो
मजवर हा रंग तसा

इथे-तिथे चोहीकडे
दरवळे सुगंध जसा
तूच आस-पास
तुझा तुझाच हा भास जसा

रात्रीच्या प्रहराचा
मंद-धुंद भाव जसा
तसे तुझ्या आठवांनी
धुंदतात दिशा-दिशा

याद तुझी, बात तुझी
सुखावणारी साथ जशी
धरणीला नेहमी तृप्त
करे बरसात जशी...!!!
धरणीला नेहमी तृप्त
करे बरसात जशी...!!!

Monday, September 7, 2015

बरस पुन्हा कधीतरी...

ये दाटुनी मेघांसारखे
अन् बरस पुन्हा कधीतरी
कर ओले-चिंब माझे मन
पण तू बरस पुन्हा कधीतरी...

तहानलेल्या मनाची
तू तहान भागव कधीतरी
झेलीन तुला सरींसारखे
पण तू बरस पुन्हा कधीतरी...

वादळागत बेभान
तू होशील का कधीतरी?
उदध्वस्त होइन तुझ्यातच
पण तू बरस पुन्हा कधीतरी...

प्रेमात चिंब भिजवूनी
तू जाशील निघून कधीतरी
श्वास रोखून उभा मी
कि तू बरसशील पुन्हा कधीतरी...

ये दाटुनी मेघांसारखे
अन् बरस पुन्हा कधीतरी...

Wednesday, August 5, 2015

रुके से कदम...

All the best Abhi n Sam for your future endeavors...!!! :-)

रूके से कदम
थर-थराते हाथ
बढती धडकने
छूटता अपनों का साथ...

भीगी हुई पलकें
बेचैनीसी दिलमें
धुंदली हुई मंजिल
न आता कुछ समझमें...

अलगसी दुनियामें
एक नया सफर
साथ देने के लिए
अंजाने हमसफर...

थोडीसी घबराहट
थोडी अपनी जिद लिए
चल पडें है हम
जीतने कि हिम्मत लिए...

बीते हुए लमहो को
दिल में बसाकर
यादों के समुंदर मे
हल्कीसी डुबकी लगाकर...

ख्वाबों के परिंदे
अब उडान भरेंगे
अपने काबिल पंखोसे
नए जहाँ कि सैर करेंगे...

अपनी सोई ख्वाहिशों को
जगाने का वक्त है
आशाओं कि पूर्ती का
यही सुनहरा पल है...!!!
आशाओं कि पूर्ती का
यही सुनहरा पल है...!!!

Thursday, July 16, 2015

कुठल्याशा ओल्या सकाळी...

कुठल्याशा ओल्या सकाळी
रिमझिम पावसाची सर
अशावेळी, सांग गं सखे
कसा पडेल तुझा विसर...

वाफळत्या कॉफीचा गंध
ओल्या मातीचा सुवास
अशावेळी, सांग गं सखे
का नसावा तुझा सहवास...

दाटलेल्या मेघांसारखे
मन हि दाटून येते
अशावेळी, सांग गं सखे
का तुझीच आठवण येते...

कुठल्याशा ओल्या सकाळी
थंडगार वारा वाहतो
अशावेळी, सांग गं सखे
का तुझाच भास होतो...
अशावेळी, सांग गं सखे
का तुझाच भास होतो...

कुठल्याशा ओल्या सकाळी...

Thursday, May 21, 2015

न दिसला मज गुलाब...

न दिसला मज गुलाब
न दिसला मज चाफा
गंध कुणाचा दरवळे
चोहीकडे... चोहीकडे...

न दिसले मज कुणी
भास कसले ह्या मनी
साद कोण घालत असे
पलीकडे... पलीकडे...

व्यर्थ वाटे मज सारे
चंद्र, सूर्य, नभातले तारे
रविचे तेज ही कमी भासे
तुझ्यापुढे... तुझ्यापुढे...

सांग सखे मज काय करावे
एकटे असे किती झुरावे
ये धाउनिया, मिठीत ये
माझ्याकडे... माझ्याकडे...

Tuesday, May 19, 2015

हळवे मन...

हळवे मन
हळव्या मनातले,ते हळवे क्षण
प्रत्येक क्षणाची,वेगळीच ओळख
अन प्रत्येक ओळखीची,वेगळीच चमक
चमकतात डोळे,तिला पाहताच क्षणी
धडधडते हृदय,तिच्या हसताक्षणी
हसणारे ओठ,मोहरणारे
काळे केस,वार्यावर उडणारे
ती लट...
साली ती एकच लट,घायाळ करणारी
अलगदपणे डोळ्यांसमोरून कानामागे जाणारी
तिच्या हसण्यात,एक वेगळीच जादू
नेहमी वाटे,तिला एकटक पाहतच राहु
अन तेवढ्यात तिचे पलटून,झटक्यात निघून जाणे
आपण फक्त परतण्याची,वाटच पाहत राहणे
हेच ते क्षण...
हेच ते क्षण...
जे करतात अधिकच हळवे मन...
जे करतात अधिकच हळवे मन...

Monday, May 18, 2015

धुंद बरसात...

हातात हात
तुझी साथ
आपण दोघं
आणि धुंद बरसात

छत्री एकच
त्यात आपण दोघे
जवळ उभे
तरी दोघेहीे ओले

अचानक वीज
कडाडते
दुसर्याक्षणी तु
आणखी जवळ येते

मिठीत तुला
सामावून घेतो
न जाणे तुला
कशा पासून वाचवतो

वाटतं
मिठी कधीच सुटु नये
जोरदार पाउस
कधीच थांबु नये

तेव्हड्यात तू
भानावर येतेस
थोडं मागे जाउन
पुन्हा जवळ येतेस

तुझ्या डोळ्यात
निघण्याचा हट्ट
माझा मात्र...
तुलाच न्याहारण्याचा हट्ट

भिजलेली तू
आणखीन सुंदर दिसतेस
नुकत्याच उमल्लेल्या
फुलाप्रमाणे दिसतेस

तुझ्या गालावरच्या
थेंबाचा, हेवा वाटला
स्वतः ही थेंब होण्याचा
हास्यास्पद विचार आला

नकळतपणे माझा हात
तुझ्या खांद्यावर
अन् तुझं डोकं अलगदपणे
माझ्या खांद्यावर

चालत आहोत
दोघच पावसात
भीजत आहोत मात्र
एकमेकांच्या प्रेमात...
भीजत आहोत मात्र
एकमेकांच्या प्रेमात...