Thursday, July 14, 2011

उत्तर हल्ल्यांना....

१३ जुलैच्या मुंबई हल्ल्याने  दुख झालं...पण आता सवय झाली आहे...कष्ट करून जगण्याची आणि जगताना प्रत्येक क्षणी मारण्याची....मेले नाहीत तरी मरण्याची टांगती तलवार डोक्यावर असतेच...पण थांबणे आपल्या लोकांमध्ये नाही हेच खरे.......


हल्ला आहे झाला
कळते हे जेव्हा,
तळपायाची आग
मस्तकात जाते तेव्हा.

भीती नाही वाटत
आता ह्या हल्ल्यांची,
सवय आहे आता
हल्ल्यासारख्या प्रकारची.

भडकून उठतात मन
आमची ह्या हल्ल्यांनी,
भडकीमध्ये तेल ओतण्याचे काम
होते नेत्यांच्या आश्वासनांनी.

नेते म्हणतात....
"सगळ्यांनी शांत राहा
अफवांवर ठेवू नका विश्वास",
नुसतं बोलून काय फायदा
कामं करा कुठलीतरी खास.

लोकांच्या स्पिरिटला करून सलाम
नेते होतात बाजूला,
लोकच असतात याक्षणी
एकमेकांच्या मदतीला.

गरजतो सारा आसमंत
मृतांच्या किंकाळ्यांनी,
एकाच प्रश्न विचारतात ते
"गुन्हा काय केला आम्ही सगळ्यांनी?"

अशा प्रश्नांना कधी
उत्तरे नसतात मिळत,
ह्याच उत्तरांच्या शोधात
राहतात कित्येक आत्मे जळत.
संपले सगळे आज
वाटत असले जरी,
हुर-हुर असतेच मनात
जाताना आपल्या घरी.

तरी उठणार मी परत
प्रत्येक वेळेस पडल्यावर,
करणार मात साग्ल्यान्समावेत
अतिरेक्यांच्या हल्ल्यांवर!!!!

         --Kavi Rahul.

Sunday, July 3, 2011

आईचे शौर्य........


 आई-जितकी मायाळू तितकीच कणखर असते आणि हि रूपं आपण एका जवानाच्या आईमध्ये हमखास पाहू शकता.आपला मुलगा शहीद झाल्यावर होणाऱ्या आईच्या मनाची घालमेल पुढील कवितेत दर्शवली आहे.......




दारावर ठक-ठक झाली
वाटलंच पोस्त-मास्तरांची स्वारी आली,
तुझेच असणार होते पत्र
ह्यात शंका नव्हती तिळमात्र.


घाईघाईत मी उघडले दार
वाचणार होती माझ्या 'वीर'ची तार,
म्हताऱ्या डोळ्यांना नीट दिसत नव्हते काही
तुझ्या पत्र येण्यानेच प्रकाशल्या दिशा दाही.


जसे मी लागले पत्र वाचू
माझे हृदय लागले आनंदाने नाचू,
वाचताना आले डोळ्यात टचकन पाणी
पत्रात होती तुझ्या गेल्याची कहाणी.


दिला मी स्वतःला खूप धीर
म्हटलं "होता माझा मुलगा एक शूर-वीर,
माझा मुलगा शहीद झाला
म्हातारीची छाती फुलवून गेला".

पण हा धीर होता खोटा
मजसाठी हा प्रसंग नव्हता छोटा,
तुझ्या आठवणी नव्हत्या मनातून जात
प्रसंगाने केला जणू माझाच घात.


कशी-बशी सरली ती रात्र
उराजवळ होतं तुझं पत्र,
कळलंच नाही कधी झाली पहाट
उजेडात देखील होता अंधार दाट.


काही दिसांनी घरी आला तुझा मृतदेह
पाहण्याचा जवळून टाळता आला नाही मोह,
तुझ्या कुरळ्या केसांतून फिरवला मी हात
जसा तुला झोपवण्यासाठी होता फिरवला जात.


गायचे मी गाणे नेहमी तुला झोपवण्यासाठी
क्षमा कर....
येत नाही कुठलंच उठवण्यासाठी,
जेव्हा तुला नेताना सलामी होती दिली
प्रत्येक गोळीने जणू मीच होते मेली.


नंतर धरली मी वाट जी जाते घराकडे
ह्याच वाटेवरून जाताना दिले तुला आयुष्याचे धडे,
जगणार होते आता मी शूर-वीराची आई बनून
फार कमी लोकांना लाभते ते पुण्य दिले तू मला कमवून.


तू शहीद होण्याचा वाटला पुन्हा एकदा अभिमान,
अजून एक असता मुलगा तर केला असता देशावर कुरबान!!


    ----राहुल पाटणकर