Tuesday, September 13, 2016

तु, मी, आणि पाऊस...

तु, मी, पाऊस, आणि कटिंग चहा
कसलं भारी रोमँटिक वाटतं
चहाच्या प्रत्येक सिप बरोबर
तुझं-माझं नातं खुलतं...

नेहमिच शोधतो तुला
रिम-झिमत्या किंवा मुसळधार पावसात
गवसतेस तु कधी-कधी
त्या काळ्या, दाटलेल्या मेघात...

आठवणींच्या पूरात कित्येकदा
तुझ्यासंगे वाहून जातो
एकटे कधी वाटल्यास
हक्काने तुझ्यातच हरवून जातो...

तशी अगोदर कधी
तुझी-माझी ओळख नव्हती
आपल्या आयुष्याची वाट तशी
नेहमीच वेगळी होती...

पण तुझं-माझं भेटणं
हे कुठेतरी लिहिलेलं होतं
अन् तुझ्या पाई यड लागणं
हे तर नक्कीच ठरलेलं होतं...

तुला पाना-फुलात शोधतो
ह्याचं लोकांना आश्चर्य वाटतं
पण सगळीकडेच तुझं असणं
हे लोकांना कुठे ठाऊक असतं...

तुझ्याशी बोलायला मला काळ-वेळ
काही बघावा लागत नाही
आपल्याच कवीतेच्या प्रेमात सांग
कुठला कवी पडत नाही?

म्हणुनच मी सगळ्यांना सांगतो कि...

मी, माझी कवीता, आणि पाऊस
आमचं भारी रोमँटिक असतं
आम्ही सोबत असताना
आम्हाला जगाचं भान नसतं...
आम्ही सोबत असताना
आम्हाला जगाचं भान नसतं...

तु, मी, पाऊस, आणि कटिंग चहा...