Dedicated to my BE EXTC-2 class...!!!! Will miss u a lot...!!!
पुन्हा कधी भेटू का आपण?
हा प्रश्न नेहमी सतावतो
कितीही प्रश्नाला बगल दिला
तरी नेहमी मनात येतो.
ती मजेची ४ वर्ष
पुन्हा कधी भेटू का आपण?
हा प्रश्न नेहमी सतावतो
कितीही प्रश्नाला बगल दिला
तरी नेहमी मनात येतो.
ती मजेची ४ वर्ष
त्या वर्षांच्या हजारो आठवणी
सगळं आठवायचं ठरवलं
कि डोळ्यात येतं टचकन पाणी
अनोळखी-अनोळखी म्हणता कधी
मैत्री झाली , कळलच नाही
मैत्रीही झाली अशी , कि आता
अनोळखी होणं शक्य नाही.
आठवायचं ठरवलं तर
क्षणांचा slideshow 'च' सुरु होतो
मनाच्या full screen वर
अखंड चालू राहतो.
अशी कशी संपली हि वर्ष
जाम राग येतो
आता कुठे आयुष्य कळलं
आणि वेगळं व्हायचं बोलतो?
कदाचित निसर्गाचाच नियम हा
कुणालाच नाही चुकला
नव्या आव्हानांवर विजय मिळवायला
आहे प्रत्येक माणूस भुकेला.
छोड न यार
कशाला फुकटचं रडायचं
शेवटचे क्षण मजा करत
हसत-हसत अलविदा म्हणायचं.
पण…
इथे अलविदा म्हणायचं
पुन्हा एकदा भेटण्यासाठी
पुन्हा एकदा हसण्यासाठी
अन पुन्हा एकमेकांना चिडवण्यासाठी.
तर मग…
पुन्हा भेटूया कधीतरी
एक नवी ओळख घेऊन
अन पुन्हा एकदा हसूया
आपल्या ह्या जुन्या रूपांना आठवून…!!!
-- Kavi Rahul
