मुलीला गर्भातच मारण्याचा मुद्दा काही नवीन नाही...ह्या विषयी आपले विचार फारच संकुचित आहेत...ह्यात चूक काय आणि बरोबर काय हे सगळ्यांना माहित आहे...पण तरी, अशी घृणास्पद कृती करणारी लोक दुर्लक्ष करतात लोकांच्या बोलण्याकडे .. कुणास ठाऊक...कदाचित आपल्या मुलीचाच आवाज त्यांना थांबवेल...तर बघूया ती गर्भातली मुलगी काय म्हणत आहे ते.....
आई मला जगात
येऊ दे गं,
तुझ्या मऊ-मऊ कुशीत
निजु दे गं.
तुझी मी बाहुली
तू खेळ माझ्या संगे,
फणी-कापड तू कर
घालू मिळून आपण दंगे.
हक्क तुझा माझ्यावर
राग कर कधीपण,
पण....
चूक माझी आता काय
मारू नको माझी माय.
आहे माझा तू आसरा
तुला देईन मी साथ,
मुलगा तुझा होईन
टाळ मारायची बात.
समजाव तू बाबांना
सांग सोडण्याचा हट्ट,
जरी मुलगी हि मी
बांधीन प्रेमाचे घरट.
९ महिने मी पोटात
झाला तुला फार त्रास,
त्रासामुळेच का गं
गळ्याभोवती माझ्या फास ?
जरी मारलस मला
रुसणार नाही तुझ्यावर,
मात असेल ती फक्त
एका आईची आईवर...!!!--Kavi Rahul.


